दीडफुटय़ा… बोलतोस किती, तुझा व्हिडीओ पाहायला तू हीरो आहेस का? पोलिसाच्या पत्नीने नित्या राणेला धू धू धुतलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस माझा व्हिडीओ काढून काहीही करू शकत नाहीत, फक्त घरी जाऊन बायकोला दाखवतील, अशा शब्दांत पोलिसांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणाऱया भाजपा आमदार नितेश राणे यांना आज पोलिसांच्या पत्नीने धू धू धुतले. नितेश राणे यांच्याविरुद्ध त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून राणे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

नितेश राणे यांनी एका जाहीर सभेमध्ये हे विधान केले होते. पोलिसांच्या पत्नींनी त्याचा निषेध करत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. त्यानंतर त्या म्हणाल्या की, नितेश राणे यांनी पोलिसांचाच नाही तर पोलिसांच्या पत्नींचाही अपमान केला आहे. आमचेच राज्य आहे, पोलीसवाले आमचे काय करणार अशी भाषा केली. म्हणजे पोलीस काय तुमच्या दबावाखाली काम करतात का, असा सवाल त्यांनी केला.

‘पोलीस जाहीर सभेत व्हिडीओ काढतात म्हणजे त्यांना त्याचे रिपोर्टिंग करायचे असते हे कदाचित नितेश राणे यांना माहीत नसावे. कदाचित ते शाळेतच गेले नसतील, असा संतापही पोलीस पत्नीने यावेळी केला. तुझा व्हिडिओ बघायला तू काय पिक्चरमधला हीरो आहेस का आणि आम्ही तुझा व्हिडीओ बघायला रिकामटेकडे नाही, असेही त्या म्हणाल्या. एक लोकप्रतिनिधी जर पोलिसांबद्दल असे जाहीरपणे बोलत असेल तर जनता कसे बोलेल असे सांगतानाच, तू आहेस केवढा, तू बोलतोस किती. पायाखाली स्टूल घेतल्याशिवाय तुला भाषणाला उभे राहता येत नाही… दीडफुटय़ा’, अशीही खिल्ली पोलीस पत्नीने उडवली.