हजारो पोलीस मतदानाचा हक्क बजावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

निवडणुकीसाठी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. निवडणुकीच्या नियमानुसार यंदा 16 हजारांहून अधिक पोलीस पोस्टल बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान करणार आहेत.

पोलीस मुख्यालयातील वार्ताहर कक्षात पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा क्राइम रिपोर्टर्स असासिएशनच्या वतीने छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त व पत्रकारांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बर्वे यांनी पत्रकारांच्या समस्या आणि सूचना ऐकून घेतल्या. यावेळी पत्रकारांसाठी सुसज्ज व नवीन वार्ताहर कक्ष उपलब्ध करून देऊ असेही बर्वे यांनी सांगितले. निवडणुकीबाबत पत्रकारांनी विचारले असता पत्रकार व पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे एवढीच अपेक्षा असल्याचे बर्वे म्हणाले. शिवाय निवडणुकीच्या काळात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेट पेपरच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.   अशी माहिती उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त देवेन भारती, आशुतोष डुंबरे, संतोष रस्तोगी, विनयकुमार चौबे, उपायुक्त मंजुनाथ शिंगे तसेच दै. ‘सामना’चे सहाय्यक संपादक व क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रभाकर पवार, असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र मोदी, माजी अध्यक्ष अस्लम शेख आदी उपस्थित होते.