
साखर कारखान्याच्या डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नूतनीकरण करण्यास मदत केल्याचा मोबदला तसेच कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असल्याबाबत लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरिता 2 लाखांची लाच घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱयाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अजित वसंतराव पाटील (50) असे या अधिकाऱयाचे नाक आहे.
उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांनी तक्रारदाराला साखर कारखान्याचे डिस्टिलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नूतनीकरण करण्यास मदत केल्यासह कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असल्याबाबत लोकांनी केलेल्या तक्रारीकर कारकाई न करण्याकरिता व प्रस्ताकित फार्मास्युटीकल्स युनिटचे कंसेन्स्ट्स टू इस्टॅब्लिश या लायसन्सचा प्रस्ताक करिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे 2 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनकणे, पोलीस नाईक अतुल घाडगे, कॉन्स्टेबल किणगी या पथकाने ही कारवाई केली.
























































