
जगाच्या पाठीवर कुठे काय घडेल याचा काही नेम नाही. लंडनमध्ये राहणाऱया एका 37 वर्षीय महिलेने चक्क आपल्या लाडक्या श्वानासाठी पाच कोटी रुपयांची हिऱयांची चेन बनवून घेतली आहे. एवढेच नव्हे तर या श्वानाच्या संरक्षणासाठी तिने अंगरक्षकांचीदेखील नेमणूक केली आहे. नॅथली नॉफ असे या महिलेचे नाव आहे. तिच्याकडे पॉमेरिनियन जातीचे श्वान आहे. या श्वानाला डॉग शोमध्ये भाग घ्यायचा होता. स्पर्धेत आपला लाडका श्वान सर्वात सुंदर दिसावा अशी या महिलेची इच्छा होती. त्यासाठी तिने ही खास चेन बनवून घेतली. जेव्हा या शोमध्ये श्वानाने एंट्री घेतली तेव्हा त्याला पाहून सर्वच थक्क झाले. ‘माझ्या श्वानावर इतपं प्रेम करते की, त्याच्यापुढे या चेनची किंमत मला काहीच वाटत नाही,’ असे त्या महिलेचे म्हणणे आहे.




























































