
स्टार प्लस वाहिनीवरील प्रतिज्ञा (पूजा गौर) आणि कृष्णा (अरहान बहल) ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्लस वाहिनी सध्या आठवडय़ाच्या एका सायंकाळी क्रीनवर टीव्हीवरील आयकॉनिक व्यक्तिरेखा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. गेल्या आठवडय़ात देखील चाहत्यांना त्यांच्या आवडत्या पात्रांना पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. 17 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता प्रेक्षकांना प्रतिज्ञा-कृष्णा ही जोडी पाहायला मिळणार आहे. प्रतिज्ञा और कृष्णा की कहाणीचे दोन्ही सीझन प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली. याबाबत अभिनेत्री पूजा गौर म्हणाली, या रविवारी प्रतिज्ञा की अनकही दास्ताच्या माध्यमातून मूळ कथानकाचा सार कायम ठेवत आम्ही एका नवीन कथेसह भेटीला येणार आहोत. प्रतिज्ञा ही भूमिका मला खूप जवळची वाटते. या भूमिकेने मला नाव, प्रसिद्धी दिली. यानिमित्ताने प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या प्रतिज्ञाला पुन्हा भेटण्याची संधी मिळणार आहे.




























































