तुम्ही पॉर्न बघताय, दंड भरा; सायबर चोरट्यांच्या जाळ्यात फसले हजारो युजर

तुम्ही पॉर्न बघताय हा पोलिसांचा संदेश असून 3 हजार रुपयांचा दंड भरा, अन्यथा तुमचा फोन ब्लॉक होईल. अशा आशयाची नोटीस पॉर्न पाहणार्‍यांच्या मोबाईलवर येत होती. तेव्हा पॉर्न पाहणार्‍यांनी दंड भरला. परंतु पोलिसांनी अशी कुठलीही नोटीस दिलेली नाही. सायबर चोरट्यांच्या जाळ्यात हजारो पॉर्न पाहणारे अडकले असून चोरट्यांनी या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहेत.

अशा प्रकाराची खोट्या नोटीसची माहिती दिल्ली पोलिसांना सोशल मीडियातून मिळाली. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तक्रार दाखल केली.

जेव्हा एखादा युजर पॉर्न साईट ओपन करतो, तेव्हा त्याला एक पॉप विंडोमध्ये नोटीस येते. पॉर्न पाहणे कायदेशीर गुन्हा आहे, त्यामुळे आता 3 हजार रुपयांचा दंड भरा. अन्यथा तुमचा फोन/कॉम्प्युटर लॉक होऊन तुमच्या विरोधात कायदेशीर करण्यात येईल असे नोटीसीत सांगण्यात येत होते. हजारो युजर्सने पोलिसांना घाबरून दंड भरला. परंतु यामागे पोलीस नसू सायबर गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या समोर आले आहेत.

अखेर पोलिसांनी याचा तपास करून चेन्नईहून तिघांना अटक केली आहे. दोघांनी यातून एक हजारहून अधिक जणांना चुना लावला असून 30ते 40 लाख रुपये जमा केले आहेत. त्यांचा एक भाऊ कंबोडियातून त्यांना मदत करत होता.

पोलीस अशा कुठल्याच प्रकारे नोटीस पाठवत नाही. तसेच अशा प्रकारे कुठलीही नोटीस दिसल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या