
खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून मृत पावलेल्या 17 व्यक्तींच्या वारसांना आज महाराष्ट्र सरकारकडून चार लाख रूपयांचा मदतीच्या धनादेशाचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
पोसरे बौद्धवाडीतील दरडग्रस्त कुटुंबीयांची पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी भेट घेतली. त्यानंतर मृतांच्या वारसांना आणि जखमी ग्रामस्थांना मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी पालकमंत्री ॲड.अनिल परब,जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील,आमदार भास्कर जाधव,योगेश कदम,जि.प.सदस्य अरविंद चव्हाण,अरूण कदम,सुनील मोरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर उपस्थित होत्या.
”पोसरे दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवणार व तुम्हाला पक्की घरे मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेईन. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने ती माझी जबाबदारी आहे”, असे यावेळी अनिल परब यांनी ग्रामस्थांना सांगितले.






























































