
कोरोनामुळे जगभरात अनेकांनी आपल्या नोकऱया गमावल्या आहेत. काही जण अजूनही नोकरीसाठी वणवण भटकत आहेत. मात्र नोकरी आवडली नाही म्हणून एका तरुणाने हटके स्टाईलने दिलेला राजीनामा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
साधारणपणे नोकरीचा राजीनामा ई-मेल किंवा अर्ज करून दिला जातो. मात्र अमेरिकेच्या लुईसविले येथील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये काम करणाऱया एका तरुणाने चक्क आउटलेटच्या बाहेर पोस्टर चिटकवत आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. ‘‘आम्ही यासाठी बंद आहोत कारण मी नोकरी सोडत आहे. मला या कामाचा कंटाळा आला आहे,’’ असे त्याने या पोस्टरवर लिहिले आहे. हे पोस्टर तुफान व्हायरल होत आहे. ग्रेट अॅप डॅड या ट्विटर हँडलवरूनही हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. साधारण नोकरीचा राजीनामा देताना नोकरदार तणावात असतात. काही जण जुन्या सहकाऱयांपासून दूर जाऊ या कल्पनेने भावूक होतात. मात्र या तरुणाचा हटके स्वॅग पाहून सर्व जण हैराण झाले आहेत.




























































