प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमतेतही वाढ होते. यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

गोरेगाव येथील प्रबोधन क्रीडा भवन येथे 42व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंत्री सुभाष देसाई यांनी केले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रबोधन क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष नितीन शिंदे यांच्यासह सुनील वेलणकर, रमेश इस्वलकर, गोविंद गावडे, पद्माकर सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी देसाई म्हणाले, 42 वर्षांपूर्वी या महोत्सवाची सुरुवात छोटय़ाशा रोपटय़ाच्या रूपात केली. आज याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. मी या महोत्सवाचा संस्थापक असून या महोत्सवाच्या स्पर्धेच्या माध्यमातून विविध शाळांतील स्पर्धकांनी राष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार प्राप्त केले आहेत याचा मला मनस्वी आनंद होत आहे. 42 व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत 191 शाळांच्या एकूण तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. हा क्रीडा महोत्सव 12 ते 15 डिसेंबरदरम्यान होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या