
सामना ऑनलाईन । बंगळुरू
‘श्री राम सेने’चे प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुथालिक यांनी लंकेश यांची कुत्र्यासोबत तुलना केली आहे. बंगळुरू येथे श्री राम सेनेच्या एका रॅलीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा वादाला तोंड फुटणार आहे.
Two murders took place in Karnataka and two in Maharashtra in Congress rule. No one questioned Congress govt failure. Instead, they are asking why is PM Modi silent and not speaking on Gauri Lankesh’s death. Is Modi responsible even if any dog dies in Karnataka?:Pramod Muthalik pic.twitter.com/e7GDdNvTbO
— ANI (@ANI) June 18, 2018
‘गौरी लंकेश यांच्या हत्येशी श्री राम सेनेचा काहीही संबंध नाही. हिंदू संघटनांनी गौरी लंकेश यांची हत्या केली अशी चर्चा आहे. पण गौरी लंकेशयांच्यासोबतच महाराष्ट्रातील दोन हत्या व कर्नाटकातील दोन हत्या या काँग्रेसचे सरकार असताना झाल्या आहेत. पण काँग्रेस सरकारच्या या अपयशाबाबत कुणी चकार शब्दही काढत नाही. पण पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया का दिल्या नाहीत यावर चर्चा करत असतात’, असं ते म्हणाले. ‘पंतप्रधान का प्रतिक्रिया देतील. तुम्हाला काय अपेक्षा आहे की कर्नाटकात प्रत्येकवेळी एखादा कुत्रा मेल्यावर मोदींनी त्यावर प्रतिक्रिया द्यायची का,’ असा सवाल देखील त्यांवी यावेळी केला.
गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास समितीने विजयपुरा जिल्ह्यातील श्री राम सेनेचा कार्यकर्ता राकेश मठ याची चौकशी केली होती. त्यानंतर श्रीराम सेना पोलिसांच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं प्रमोद मुथालिक यांनी म्हटलं आहे.
























































