
ऑन डिमांड स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘उल्लू’ ने थरारक आणि रहस्यमय सीरीज ‘प्रतीक्षा’ची घोषणा केली आहे. 14 भागांची सीरीज 26 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे दिग्दर्शन दीपक पांडे यांनी केले आहे.
ही कथा आहे भ्रष्टाचार, फसवणूक आणि अर्थातच रहस्याची. टिव्ही स्टार आणि युथ आयकॉन प्रतिक्षा सिंग ही घरात मृत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडते. मनोरंजन जगताला मोठा हादरा बसतो. प्रतीक्षाची व्यसनं, ड्रग्ज, बॉयफ्रेंड यावर प्रसारमाध्यमांमध्ये लिहून येतं. वरवर पाहता ही आत्महत्या असली तरी तिचा मृत्यू संशयास्पद असतो. या घटनेनंतर दोन वर्षांनी परदेशातील एक पत्रकार तिच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करतो. यातून रहस्यांची मालिका वाढत जाते. सणासुदीत प्रेक्षकांना वेगळ्या पंटेंटचा आनंद घेता येईल, अशी भावना उल्लू डिजिटलचे सीईओ विभू अग्रवाल यांनी व्यक्त केली.




























































