आत्महत्या केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे कुटुंब आर्थिक संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका मालिकेने या अभिनेत्रीला रातोरात स्टार बनवलं. अगदी यशाच्या शिखरावर ती पोहोचली. घराघरातली लाडकी सून झाली. पैसा, स्टेटस देखील वाढले. मात्र तिच्या आयुष्यात काहीतरी असे घडले की तिने थेट आत्महत्येचा निर्णय घेतला. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी विषयी.

pratyusha-banerjee

प्रत्युषाने अवघ्या काही वर्षातच मोठ्या प्रमाणात फेम व पैसा कमावला. मात्र तिने आत्महत्या केल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. प्रत्युषाच्या आत्महत्येसाठी तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर तिच्या पालकांनी आरोप केले. त्याच्याविरोधात खटला लढता लढता आता प्रत्युषाचे आई वडिल आर्थिक संकटात अडकले आहेत.
बालिका वधू या मालिकेतून प्रसिद्धीला आलेली प्रत्युषा बॅनर्जी हिने 1 एप्रिल 2016 रोजी गळफास लावून आत्महत्या केली. एका मुलाखतीत प्रत्युषाच्या वडिलांनी सांगितले की, ‘त्या घटनेनंतर आमचं आयुष्य पूर्ण बदललं. त्या घटनेनं आमचं सर्वस्वच हिरावून घेतलं. आता आमच्याकडे बिलकूल पैसे नाहीत. आम्ही एका खोलीच्या छोट्या घरात राहतो. प्रत्युषासाठी गेली पाच वर्ष लढताना आम्ही सर्व गमावून बसलो आहे.बऱ्याचदा आम्हाला आमच्या उदरनिर्वाहासाठी लोकांकड़ून कर्ज घ्यावे लागत आहे. प्रत्युषाची आई एका लहान मुलांच्या डे केअर मध्ये काम करते तर मी कथ लिहतो. या पैशाच्या चणचणीमुळे आम्ही प्रत्युषाच्या खटल्यातून हार मानू की काय या विचाराने त्रास होतो’, असे प्रत्युषाचे वडिल शंकर बॅनर्जी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.