प्रवीण तोगडिया नवा पक्ष स्थापन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वडोदरा

विश्व हिंदू परषिदेचे माजी नेते प्रवीण तोगडिया २४ जूनला नवा पक्ष स्थापन करणार आहेत. मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. वडोदरामध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मोदी सरकारला तोगडिया यांनी उणे २५ टक्के गुण देत सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली. फक्त स्वप्न दाखवून सत्ता मिळवता येत नाही. सत्तेसाठी सरकारने काम करावे लागते आणि त्याचे चांगले परिणामही दिसावे लागतात असे ते म्हणाले. मोदी सरकारने त्यांच्या आश्वासनांपासून यू टर्न घेतल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे अनेक नेते नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदी सरकारने हिंदुत्ववाद्यांची निराशा केली आहे असे ते म्हणाले. सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा, गोवंश हत्याबंदी लागू करावी आणि ३७० कलम रद्द करण्याची मागणी केली. तोगडिया यांनी १४ एप्रिलला विहिंपची साथ सोडली होती. त्यानंतर आता त्यांनी नवीन पक्ष स्थापण्याची घोषणा केली आहे.