प्रवीण तोगडियांचा स्थापन करणार नवा पक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वडोदरा

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेले प्रवीण तोगडिया हे आपल्या नव्या स्वतंत्र पक्षाची घोषणा करणार आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जाते.

मोदी यांनी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवली पण त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत असा आरोप करतानाच तोगडिया यांनी मोदी यांना ‘अपयशाचे धनी’ ठरवले आहे. अयोध्येत राममंदिराच्या उभारणीचा मार्ग सुकर करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, गोहत्येवर पूर्ण बंदी घालावी, राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्यात यावे, समान नागरी कायदा लागू करावा या मागण्या तोगडिया यांनी केल्या आहेत.