कोव्हिशिल्डचा प्रिकॉशन डोसही ओमायक्रोनवर प्रभावी ठरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा प्रिकॉशन डोस कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रोनवर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले होते. तशीच बातमी एस्ट्राजेनेकाच्या लसीबद्दलही आली आहे. एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सजेवरिया या लसीचा प्रिकॉशन डोस ओमायक्रोनबरोबरच बीटा, डेल्टा, अल्फा आणि गॅमासह अन्य व्हेरिएंटविरोधात मोठय़ा प्रमाणात अॅण्टीबॉडीज निर्माण करतो असे एका अभ्यासात दिसून आले आहे. एस्ट्राजेनेकाची लस ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी बनवली आहे. हिंदुस्थानात ही लस सिरम इन्स्टिटय़ूटमध्ये कोव्हिशिल्ड नावाने बनवली गेली आहे. इतरत्र तिचे नाव व्हॅक्सजेवरिया असे आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी अभ्यासातून आलेले हे नवे निष्कर्ष शेअर केले आहेत. कोरोनाचा पुन्हा जगभरात प्रकोप निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन डोसनंतर आणखी एक तिसरा प्रिकॉशन डोस देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने विविध लसींबद्दल अभ्यास सुरू आहे.