
आहार-विहार, व्यायाम, ताणतणाव, हार्मोनल बदल याचा स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होतो. गरोदरपणात स्त्रियांनी आहार आणि दैनंदिन जीवनशैलीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनशैलीचा परिणाम मुलाच्या वाढीसाठी होतो. गरोदरपणात स्त्रिया कशा राहतात याचा परिणाम बाळावर होत असतो. त्यामुळे गरोदरपणात काय टाळावे, काय करावे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. पाहूया, या दिवसांत जीवनशैलीत कोणते बदल करणे आवश्यक आहे.
अल्कोहोल सेवन
अल्कोहोलचे सेवन करणे गरोदर महिलांसाठी धोकादायक आहे. जेव्हा एखादी गर्भवती महिला दारू पिते तेव्हा अल्कोहोलचा परिणाम गर्भापर्यंत होतो. यामुळे भ्रूणही अल्कोहोल सिंड्रोम होते. गर्भाचा संपर्क अल्कोहोलशी आल्यामुळे गर्भाला अल्कोहोल सिंड्रोमशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे शारीरिक अपंगत्व, गतिमंद आणि बाळाचा विकास खुंटू शकतो. या गंभीर समस्यांमुळे बहुंताश डॉक्टर गर्भवती महिलांना व्यसन टाळण्याचा सल्ला देतात.
कॅफिनचे अति प्रमाण
गर्भवती महिलांनी कॅफिनचे अतिरिक्त सेवन केल्याने अल्कोहोलप्रमाणेच कॅफिनचाही परिणाम गर्भावर होतो. या दिवसांत दररोज 300 मिलिग्रॅमपेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. गरोदर महिलांनी दररोज 200 मिलीग्रॅमपेक्षा जास्त म्हणजे दीड कप कॉफीपेक्षा जास्त कॉफीचे सेवन करू नये.
हॉट बाथ आणि ओव्हरहिटिंग
गरम पाण्याने अंघोळ करणेही गरोदर महिलांसाठी त्रासदायक ठरू शकते. टब बाथमध्ये अंघोळ न करण्याचा सल्ला या दिवसांत तज्ज्ञ देतात. अमेरिकन प्रेग्नंन्सी असोसिएशनने दिलेल्या सल्ल्यानुसार, हॉट टब हायपरथर्मियामुळे शरीराचे तापमान वाढते. यामुळे गर्भवतींनी हॉट योग पिलाटीज, खूप वेळ उन्हात बसणे, डिहायड्रेशन, जेथील तापमान गरम असेल त्या ठिकाणी जास्त वेळ बसणे टाळावे.
काही व्यायामप्रकार
गर्भवती स्त्रियांना व्यायाम करण्याचा सल्लाही दिला जातो, मात्र काही व्यायाम प्रकार करणे त्यांनी टाळणे गरजेचे आहे. उड्या मारणे, शरीराला झटका देणारे व्यायाम प्रकार, सुरुवातीच्या तीन महिन्यानंतर सिटअप, क्रंचेज यासारखे व्यायाम प्रकार, जड वस्तू उचलणे हे व्यायाम प्रकार या दिवसांत अशा महिलांनी करू नयेत. त्याऐवजी चालणे, पोहणे आणि स्क्वॅटिंग करणे फायदेशीर ठरू शकते, मात्र त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
धूम्रपान
गर्भावस्थेदरम्यान सिगरेट ओढणे महिला आणि बाळाकरिता नुकसानकारक आहे. यामुळ ह्रदयाचे विकार, फुफ्फुसाचे विकार, कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. धूम्रपान केल्यामुळे वेळेआधीच जन्म होणे, अचानक मुलाचा मृत्यू होणे, प्लेसेंटा समस्या, जन्मजात समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे महिलांनी गर्भवती असल्याचे समजल्यास धूम्रपान करणे बंद करावे आणि धुराचा संपर्कही टाळावा.
कॉन्ट्रॅक्ट गेम
अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्सने दिलेल्या सल्ल्यानुसार, गर्भवती महिलांनी फुटबॉल किंवा बॉक्सिंगसारखे संपर्क खेळ टाळावेत. याचे कारण हे की, संपर्क खेळांमुळे प्लेसेंटल बिघडण्याचा धोका वाढतो. यामुळे अकाली जन्म होण्याची समस्या वाढू शकते.
धोकादायक घोडेस्वारी टाळावी
ज्या महिला म्युझियम पार्कमध्ये जातात तेथे त्या राईड्सही करतात. जर एखादी गर्भवती महिला म्युझियम पार्कमध्ये जात असेल तर तिने रोलर कोस्टर किंवा इतर कोणतीही राईड टाळणे आवश्यक आहे.




























































