राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण; आता लक्ष निकालाकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या 15 व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 21 जुलै रोजी होणाऱ्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 21 जुलैला मतमोजणी होत निकाल जाहीर होणार आहेत. तर 25 जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसासाठी सोमवारी संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभेत मतदान झाले. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सोमवारी सकाळी 10 वाजता मतदानाच्या प्रक्रियोला सुरुवात झाली. राज्यांच्या विधानसभा आणि संसद भवनात मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी संसदेत मतदान केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह व्हीलचेअरवरून मतदानासाठी आले होते. प्रकृती अस्वास्थ असूनही ते मतदानासाठी आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्रई किरण रिजिजू, काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला, सपाच्या खासदार जया बच्चन यांनीही मतदान केले आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि आमदारांनीही मतदान केले आहे.

तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पीपीई किट घालून मतदान केले. ते कोरोना संक्रमित असल्याने ते पीपीई किटमध्ये मतदानासाठी आले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रई ममता बॅनर्जी यांनीही मतदान केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्रई अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी, शशी थरूर यांनीही मतदान केले आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रऑस वोटिंग झाल्याचे वृत्त इंडिया टूडे ने दिले आहे. आता नवे राष्ट्रपती कोण, याचा निकाल 21 जुलैला होणार आहे.