राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या 15 व्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलैला मतदान होईल. तसेच आवश्यकता भासल्यास 21 जुलैला मतमोजणी केली जाईल. नवे राष्ट्रपती 25 जुलैला शपथ घेतील, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलैला संपणार आहे. त्यामुळे नवे राष्ट्रपती कोण असणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी आयोग 15 जूनला अधिसूचना काढणार आहे. देशातील 776 खासदार आणि 4,033 आमदार असे एकूण 4,809 मतदार नव्या राष्ट्रपतींची निवड करणार आहेत. खासदारांसाठी संसद तर आमदारांसाठी संबंधित राज्याच्या विधानसभांमध्ये मतदानाचा हक्क बजावता येईल. इतर ठिकाणावरून मतदान करण्यासाठी किमान दहा दिवस आधी पूर्वसूचना द्यावी लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम
– 15 ते 29 जूनदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. n 30 जूनला उमेदवारी अर्जांची छाननी n 2 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार n 18 जुलैला मतदान