स्त्रीशक्तीला सलाम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध संघटना आणि संस्थांकडून राज्यभरात आरोग्य शिबीर, व्याख्यान, मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचादेखील गौरव करण्यात आला. 

भांडुप (पश्चिम) प्रभाग क्र.113 येथे नगरसेविका दिपमाला बढे यांच्या प्रयत्नाने, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना टॅब वाटप तसेच गरजू महिलांना शिवणयंत्र वाटप तसेच नवजीवन शाळेजवळील शिल्पाचे अनावरण शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले मॅडम, राजोल संजय पाटील, संदीप राऊत व स्थानिक नागरिक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक 191 च्या वतीने महापालिका सभागृह नेत्या व नगरसेविका विशाखा राऊत यांनी कर्तुत्ववान महिलांचा सत्कार केला. ज्वेलरी उद्योजिका आसावरी पेडणेकर, जिम्नॅस्टिक प्रशिक्षक डॉ. नीता ताटके व वर्षा उपाध्ये, कोविड योद्धा डॉ. अनुष्का पवार, हॉटेल व्यावसायिक आदिती कामत, निर्भया पथक प्रमुख प्राजक्ता गुरव यांना सन्मानित केले. त्याप्रसंगी माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेविका हेमांगी वरळीकर, प्रीता पाटणकर, सिद्धिविनायक ट्रस्टच्या सदस्य वैशाली पाटणकर, शाखाप्रमुख अजित कदम.

को- ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई युनिट मराठा सहकारी बँक लिमिटेड व बँक व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या बँकेतील महिला कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा बँकेचे मुख्य कार्यालय अंधेरी येथे प्रमुख पाहुणे को- ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईचे सल्लागार माजी आमदार अभिजित अडसूळ व मराठा बॅंकेच्या अध्यक्षा अनुश्री माळगांवकर  तसेच अंधेरी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक (निर्भया पथक) रोहिणी जगताप, शिवसेना महिला शाखा संघटक आकांक्षा शिंदे, बँकेच्या संचालिका सुषमा शिंदे तसेच बँकेचे सीईओ शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.