‘भगवान का तोहफा’ म्हणत मुलांवर बलात्कार करणाऱ्या पादरीला 30 वर्षाची शिक्षा

1971

लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 81 वर्षीय रोमन कॅथोलिक पादरीला अमेरिकेतील न्यायालयाने 30 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पादरीला आता मृत्यूपर्यंत आपले आयुष्य तुरुंगात घालवावे लागणार आहे.

पादरी लहान मुलांना आणि मुलींवर अत्याचार करत होता. वासनांध पादरी लहान मुला-मुलींसोबत आंघोळ करायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. मुलांनी कुठे वाच्यता करू नये म्हणून तो त्यांना हा ‘भगवान का तोहफा’ असल्याचे सांगायचा. 60 ते 80 च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये लहान मुलांना आपल्या वासनेचा शिकार बनवलेला हा पादरी मोरोक्कोमध्ये पळाला होता. 1990 मध्ये त्याला अटक करण्यात आली आणि अमेरिकेत आणण्यात आले.

पादरीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी लैंगिक शोषणाचे शिकार झालेली मुलं आता मोठी झाली होती आणि त्यांनी पादरीच्या अत्याचाराला वाचा फोडली. मी 9 वर्षाचा असताना पादरी आमच्यासोबत आंघोळ करायचा आणि लैंगिक अत्याचार करायचा असे एका पीडिताने न्यायालयात सांगितले.

एका महिला पीडितेने सांगितले की, पादरी आमचे चुंबन घ्यायचा आणि ही सामान्य गोष्ट असल्याचे म्हणायचा. सलग 2 वर्ष त्याने माझे लैंगिक शोषण केले. बलात्कारानंतर तो हा ‘भगवान का तोहफा’ असल्याचे सांगायचा, असेही पीडितने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या