
अमेरिका, इस्रायल इराण यांच्यात आठवड्याभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध फक्त आखाती देशातच नाही तर जगासाठी धोकादायक आहे. रशियाकडून तेल खरेदीसाठी आपल्याला अमेरिकेची परवानगी का घ्यावी लागते? परवानगी गुलाम राष्ट्रांना दिली जाते. त्यामुळे हिंदुस्थानला आता अमेरिकेने गुलाम केले आहे, असे चित्र दिसत आहे. त्यामुळे देशाला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला सुनावले आहे.
भारत देश को गुलाम बनाने वाले प्रधानमंत्री मोदी को
तुरंत इस्तीफा देना चाहिये!
देश का अपमान
नही सहेगा हिंदुस्थान!@BJP4India @RahulGandhi https://t.co/fYFsYORRP6— Sanjay Raut (@rautsanjay61) March 6, 2026
याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारताला गुलाम बनवणारे पंतप्रधान मोदी यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा! हिंदुस्थान आपल्या देशाचा हा अपमान सहन करणार नाही! अशी मागणी संजय राऊत यांनी पोस्टद्वारे केली आहे. देशाला आता कोणतेही राष्ट्रीय, परराष्ट्रीय धोरण नसल्याचे दिसत आहे. तसेच हिंदुस्थान कोणाचा तरी गुलाम म्हणून काम करतोय काय, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतली आहे. अमेरिकेच्या इशाऱ्या प्रमाणे हिंदुस्थान नाचत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेने आपल्याला रशियाकडून तेल खेरदीची परवानगी दिली आहे. परवानगी ही गुलाम राष्ट्रांना दिली जाते. रशियाकडून तेल खरेदी करण्याची हिंमत आमच्यात नाही, अमेरिकेच्या मेहेरबानीवर आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असून तर थूत आहे अशा जिंदगानीवर अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला केला.





























































