Video : पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान कॅमेरामन बेशुद्ध, पाहा मोदींनी काय केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सूरत

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना एक कॅमेरामन बेशुद्ध झाला. कॅमेरामन बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच मोदींनी भाषण थांबवले आणि तत्कान रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॅमेरामनच्या नाव किशन रमोलिया असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मोदींच्या हस्ते नवीन बस डेपोच्या शिलान्यासाचा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. मोदींचे भाषण सुरू असताना कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आलेला कॅमेरामन बेशुद्ध होतो. व्हिडीओमध्ये काही व्यक्ती एकाला घेऊन जाताना दिसत असून मोदी या दरम्यान आपले भाषण थांबवतात आणि सोबतच्या अधिकाऱ्यांना आजारी व्यक्तीसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे निर्देश देतात. मोदींच्या आदेशानंतर 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली जाते आणि कॅमेरामनला रुग्णालयात दाखल करण्यात येते.

म्हणून बेशुद्ध पडलो
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम कव्हर करत होतो आणि मी सकाळपासून पाणी प्यायले नव्हते. यामुळे मला गुंगी आल्याचे कॅमेरामन किशन रमोलिया याने सांगितले. तसेच कार्यक्रमस्थळी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी मला तत्काळ मदत केल्याचेही तो म्हणाला.