
– आशीष बनसोडे
लॉकडाऊनमुळे कारागृहातील बंद झालेला मुलाखत कक्ष आता येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड-19 संबंधातील नियम व अटींची पूर्तता करून नातेवाईकांना कारागृहात असलेल्या पैद्याला भेटता येणार आहे. दरम्यान, आजपासून आर्थर रोड व ठाणे कारागृहात वकिलांना पैद्यांना भेटण्याची मुभा देण्यात आली आहे.
गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू झाले. परिणामी सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पैदी आणि त्यांच्या पुटुंबीयांना भेटण्यासाठी असणारा मुलाखत कक्ष बंद करण्यात आला. नऊ महिने हा कक्ष बंद होता, पण आता कारागृहात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असल्याने मुलाखत कक्ष पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यामळे एकमेकांंना भेटण्यासाठी आतुर असलेल्या पैदी व त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आजपासून आर्थर रोड व ठाणे कारागृहात वकिलांना पैद्यांची भेट घेण्यास सुरुवात करण्यात आली तर नातेवाईकांना सोमवारपासून कारागृहात असलेल्या त्यांच्या पैदी नातेवाईकास भेटता येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यातील सर्व मध्यवर्ती व जिल्हा तुरुंग अधीक्षकांना याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहेत. त्या अधीक्षकांनी पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड-19शी संबंधित नियमांचे पालन करून मुलाखत कक्ष सुरू करण्याबाबत सांगण्यात आल्याचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले. पैद्यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकास मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाचऐवजी दोघांनाच भेटण्याची मुभा
याआधी पाच नातेवाईकांना पैद्याची भेट घेता येत होती. कोरोनामुळे आता त्यात बदल करून पाचऐवजी दोघा नातेवाईकांनाच पैद्याला भेटण्याची परवानगी देण्यात येणार आहे, तर 15 वर्षांखालील आणि 55 वर्षांवरील पैद्यांना मात्र त्यांच्या नातेवाईकास तूर्तास तरी भेटता येणार नाही. या वयोगटातील पैद्यांसाठी मुलाखत कक्ष बंदच राहणार आहे.
फोनवरून साधत होते संपर्क
मुलाखत कक्ष बंद केल्यानंतर पैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधता यावा यासाठी कॉईन बॉक्स फोनची सुविधा उपलब्ध केली होती. पण आता पुन्हा मुलाखत कक्ष सुरू होत असल्याने पैद्यांना त्यांच्या नातेवाईकास पूर्वीप्रमाणे भेटता येणार आहे.




























































