‘दादा, मी प्रेग्नंट आहे’… प्रिया बापटने सांगितली ‘गूड न्यूज’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया बापट हिची एक इस्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. पती उमेश कामत याच्यासोबत तिने एक गुड न्यूज असल्याचा फोटो शेअर केला होता. अनेकांनी ती गर्भवती असल्याचं समजून तिला शुभेच्छाही दिल्या होत्या. पण, आता खरं चित्र स्पष्ट झालं असून प्रिया नाही तर वेगळीच व्यक्ती प्रेग्नंट असल्याचं समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई, पुण्यात दादा मी प्रेग्नंट आहे या पोस्टरने पार धुमाकूळ घातला होता. ही पोस्टर्स नेमकी कुणी आणि का चिकटवली असावीत असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण, आता या पोस्टर्सच्या मागच्या रहस्याचा उलगडा झाला आहे. अभिनयाच्या क्षेत्राच्या पुढे पाऊल टाकत प्रिया आता नाट्यनिर्मितीकडे वळली असून तिच्या निर्मितीसंस्थेचं पहिलंवहिलं नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. दादा एक गुडन्यूज आहे असं या नाटकाचं नाव असून अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता उमेश कामत या नाटकात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


View this post on Instagram

तर ही आहे गुड न्यूज! आमची पहिली निर्मिती. खूप मनापासून, प्रेमाने जपलेली आणि वाढवलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत, तसंच आमच्या या नव्या प्रवासाला सुध्दा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळू देत. This is the ‘GOOD NEWS’. This is our baby. There is no greater happiness than producing and supporting the content that you believe in. Umesh and I have been blessed with tremendous love and support from our family, friends and fans over the years. We wish to seek your blessings for this new journey. Wish us all the luck and shower your love upon this one too! #DadaEkGoodNewsAhe

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

या नाटकाचं लेखन कल्याणी पाठारे यांचं असून दिग्दर्शन अद्वैत दादरकर याचं आहे. नावावरूनच हे नाटक वेगळ्या धाटणीचं वाटत आहे. मात्र या नाटकाचा शुभारंभ कधी होणार ते अद्याप गुलदस्त्यात आहे.