अनुष्कानंतर प्रियांकाकडे गुड न्यूज? म्हणते, आम्हाला एक क्रिकेट टीमच बनवायचीय

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने सोमवारी मुलीला जन्म दिला. लवकरच करीना कपूर-खान देखील दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यानंतर आता चाहत्यांचे कान प्रियांका चोप्राकडे लागले असून ती कधी गुड न्यूज देतेय असा सवाल तिला विचारला जातोय. विशेष म्हणजे प्रियांका देखील बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक असून तिला एक-दोन नव्हे तर एक अख्खी क्रिकेट टीमच बनवायची आहे.

एका मुलाखतीमध्ये तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता प्रियांका म्हणाली की, मला खूप सारे मुलं हवी आहेत. एवढे की एक अख्खी क्रिकेट टीमच बनायला हवी. तसेच यावेळी तिने आपले खासगी आयुष्य, लग्न, कारकीर्द आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबत देखील दिलखुलास गप्पा मारल्या. ‘दै. भास्कर’ने याबाबत वृत्त दिले आहे.

priyanka-nick-jonas

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी 2018 मध्ये लग्न केले. मुलाखतीदरम्यान प्रियांकाला फॅमिली प्लॅनिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रियांका म्हणाली की, मला जेवढी मुलं होतीत तेवढी हवी आहेत. एक क्रिकेट टीमही बनू शकते.

नात्यात वयाचे आणि संस्कृतीचा अडथळा नाही

आमच्या नात्यात वयाचे अंतर आणि संस्कृतीचा अडथळा कधीच आला नाही. आम्ही एका नॉर्मल कपलप्रमाणे आमचे आयुष्य जगत आहोत. तुम्हाला एकमेकांच्या सवयी आधी जाणून घ्यायला हव्या आणि एकमेकांना काय पसंद आहे याबाबतही जाणून घ्यायला हवे. आमच्यासाठी हे जराही कठीण नव्हते, असेही प्रियांका यावेळी म्हणाली.

लॉकडाऊनमध्ये एकमेकांना अधिक समजून घेता आले

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात आम्ही एकमेकांना अधिक जवळून समजून घेतले. आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजते. कारण आम्ही दोघेही शूटिंगमध्ये व्यस्त असतो आणि त्यामुळे एकमेकांना हवा तसा वेळही देता येत नाही, असेही प्रियांकाने दिलखुलासपणे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या