पकड, पकड, कसके पकड! ‘यू मुंबा’च्या सरावाचा थरारक फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कबड्डी शौकिनांसाठी ‘प्रोकबड्डी’चा हंगाम या डिसेंबर महिन्यात पुन्हा सुरु होतोय. या हंगामातील जेतेपदासाठी सर्वच संघांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. प्रो कबड्डीचा माजी विजेता यू मुंबा संघही जोरदार सरावाला लागला आहे.

‘खूप सारा जोश घेऊन दिवसाची उत्साही सुरुवात’ अशा शीर्षकाने यू मुंबा संघाने आपल्या सरावाचा चित्तथरारक फोटो व्हायरल केला आहे. त्यात मुंबईचे तीन दमदार कबड्डीपटू झेप घेऊन निसटू पाहणाऱ्या रेडरची हवाई पकड करताना दिसत आहेत. पकड, पकड, कसके पकड असे शब्द झटकन तोंडात यावे असे हे छायाचित्र कबड्डीशौकिनांत अतिशय लोकप्रिय ठरले आहे.

“हल्ला करणारा आता तावडीत सापडला आहे, की तो पकडीतून सुटून जाईल?” असा प्रश्न या फोटोवर यु मुंबाने कबड्डी शौकिनांना विचारला आहे. सोबतच त्यांनी #UMumba | #MeMumba | #Mumboys | #WeAreMumba | #WeAreMumbai | #AbKooPeKabaddi असे हॅशटॅग वापरले आहेत. ‘कू’ वरचे बहुभाषिक फीचर्स वापरून ‘यू मुंबा’ खास मराठी, हिंदी आणि इंग्रजीत कू करत असते. टीमने सतत शेअर केलेले फोटोज आणि व्हीडिओज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

2015 साली प्रो कबड्डी लीगचा विजेता असलेला यु मुंबा संघ या सीझनमधला एक उत्कृष्ट संघ म्हणून नाव कमावून आहे. कबड्डी हा देशी खेळ आहे. प्रो कबड्डी लीगने कबड्डीला नवी लोकप्रियता मिळवून दिली आहे. कबड्डी आता चाहत्यांसह नव्याने उद्याला येणाऱ्या खेळाडूंचाही जोरदार प्रतिसाद मिळवते आहे.