नगर जिल्हय़ात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज नगर शहरासह जिह्यात उत्साहात साजरी झाली. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. यामुळे अवघा जिल्हा ‘शिवमय’ झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी शहरातून जिल्हा मराठा समाज प्रसारक मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली मिरवणूक नगरकरांचे आकर्षण ठरली. आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ, आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, बाळासाहेब पवार, निखिल वारे, प्रा. सीताराम काकडे, ज्ञानेश्वर काळे, सागर गुंजाळ, संपत नलावडे, जयंत वाघ, संजीव भोर, विवेक नाईक, गीतांजली काळे, पल्लवी जाधव यांच्यासह विद्यार्थी, नागरिक, शिवप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत पारंपरिक कला-नृत्ये सादर केली. तसेच विविध विषयांवरील समाजप्रबोधनाचे देखावे सादर करण्यात आले होते.

शिवसेना उपनेते, माजी आमदार अनिल राठोड मित्रमंडळाच्या वतीने परंपरेप्रमाणे जिल्हा मराठा संस्थेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये युवानेते विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगिराज गाडे, बाळासाहेब बोराटे यांनी लेझीम खेळत मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

महापालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्युतरोषणाई करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, शहर अभियंता मनोज पारखे, परिमल निकम, श्रीकांत निंबाळकर, शशिकांत नजन, अशोक साबळे, महादेव काकडे, रोहोकले, शिंदे, बंडू इवळे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास विविध सामाजिक-राजकीय संघटना, शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

z नगर जिह्यातील कर्जत, पाथर्डी, निघोज, संगमनेर, पारनेर, राहुरी, राहाता आदी तालुक्यांमध्ये शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. अनेक ठिकाणी मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.