‘आरआरआर’ हा बॉलीवूड नव्हे तर तेलुगू चित्रपट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळय़ात ‘आरआरआर’ या चित्रपटाला ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. देशभरात या चित्रपटाचे कौतुक होत असताना निर्माते-दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी बॉलीवूडबद्दल केलेल्या एका विधानामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. राजामौली म्हणाले, ‘माझा चित्रपट हा बॉलीवूड चित्रपट नाही. हा दक्षिण हिंदुस्थानातील तेलुगू चित्रपट आहे. जिथे माझी पाळमुळं जोडली आहेत. चित्रपटात थोडासा विरंगुळा म्हणून किंवा तुम्हाला डान्स आणि म्युझिक दाखवायला या गाण्याचा समावेश मी केला नव्हता तर चित्रपटाची कथा पुढे न्यायला मी या गाण्याचा वापर केला