
>>नरेश यावलकर, शेअर मार्केट मार्गदर्शक, rimetechnicals.com
मागील लेखांमध्ये आपण करार समाप्तीच्या तारखेला कॉल खरेदी करणाऱ्याचा नफा-तोटा कसा असतो हे एका उदाहरणावरून समजून घेतले. आज आपण पुट खरेदी करणाऱ्याचा नफा-तोटा कसा होईल हे समजून घेऊ. ऑप्शन्सची खरेदी-विक्री करणे म्हणजे शेअर्सची खरेदी-विक्री करण्याच्या अधिकाराची खरेदी- विक्री करणे होय. जर एखाद्याला वाटत असेल की, बाजार खाली जाऊ शकतो, तर तो वस्तू विकेल व भाव खाली उतरल्यानंतर विकत घेऊन नफा कमावेल, परंतु त्याच्याजवळ शेअर्स नसल्याने तो पुट म्हणजे शेअर्स विकण्याचा अधिकार विकत घेईल.
पुट ऑप्शन्सः विकत घेणारा फक्त अधिकार घेत असून जबाबदारी घेत नसल्याने भाव कितीही वर गेले तरी जे प्रीमियम त्याने पुट विकणाऱ्याला दिले त्यापेक्षा जास्त तोटा होणार नाही. परंतु शेअर्सचे भाव खाली गेल्यास अमर्यादित नफा होऊ शकतो.
20 जून रोजी एसबीआयचा भाव 565, मला वाटते एक्सपायरी 27 जुलैपर्यंत भाव 520 पर्यंत खाली जाईल. त्यामुळे मी पुट विकत घेईन. मी 560 चा पुट ज्याची किंमत फक्त 10 आहे, म्हणजे मला फक्त रु. 15000 प्रीमियम / अधिभार विव्रेत्याला द्यावे लागेल. (10. 00 X 1500 लॉट) स्ट्राइक कोणता घ्यायचा व इतर गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत हळूहळू समजून घेऊ.
वरील उदाहरणावरून या गोष्टी स्पष्ट होतात…
एसबीआय कितीही वर गेला तरी जास्तीत जास्त तोटा मर्यादित म्हणजे फक्त प्रीमियम एवढाच आहे.
एसबीआय जितका खाली जाईल तितका नफा वाढेल व अमर्यादित वाढू शकतो.
565 वरून समाप्तीच्या तारखेला 550 पर्यंत खाली पडूनसुद्धा पुट खरेदी करणाऱ्यास नफा मिळत नाही. त्यामुळे तोटा होतो.

























































