शिरूर न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत अभूतपूर्व प्रतिसाद, 63 खटले तडजोडीने सुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कवठे येमाई

शिरूर न्यायालयात काल रविवार दि.17 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून 63 दिवाणी व फौजदारी खटले तडजोडीने मिटविण्यात आली असून सुमारे 5 कोटी रुपयांची देखील वसुली करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. सीमा प्रमोद काशीकर यांनी बोलताना दिली.

जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली घोडनदी-शिरूर न्यायालयात काल रविवार दि. 17 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य न्यायाधीश श्रीमती आर.एन्.खान, सहन्यायाधीश श्रीमती एस्.आर.बांदल, श्रीमती पी.के.करवंदे, आर.डी. हिंगणगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोक अदालतीचे कामकाज सुरू करण्यात आले. यावेळी घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. दिपक ढमढेरे, उपाध्यक्ष अ‍ॅड.निलेश कर्डिले व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.आर.व्ही.जाधव, अ‍ॅड.एन्.डी.मगर, अ‍ॅड.एस्.डी.ढमढेरे, अ‍ॅड.एन्.एम्.वाखारे, अ‍ॅड. सागर गायकवाड, नवनिर्वाचित नोटरी अ‍ॅड.आर.के.खांडरे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. सीमा प्रमोद काशीकर, अ‍ॅड. रंजना घाडगे, अ‍ॅड. पी.टी.बारवकर, अ‍ॅड. गवारी, अ‍ॅड. धनवडे आदींनी पॅनेल जज म्हणून काम पाहिले. शिरूर न्यायालयात झालेल्या या लोकअदालतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून सर्व नगरपालिका, बँका, ग्रामपंचायती व एम.आय.डी.सी.तील कंपन्याची जवळपास 5 कोटी रूपयांची वसुली देखील यावेळी करण्यात आली. तर यावेळी 63 दिवाणी व फौजदारी खटले तडजोडीने मिटविण्यात आले असल्याचे अ‍ॅड. सीमा काशीकर यांनी सांगितले.