
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी सकाळी ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोहोचले. दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
हायप्रोफाईल हाताळणारे वकील अशी उज्ज्वल निकम यांची ख्याती आहे. सध्या ते काही खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम पहात असून याच संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती.





























































