बँकांच्या कामकाजाच्या वेळा बदलणार, ग्राहकांना मिळणार दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sbi-poster

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बँकिंग क्षेत्रासंदर्भातील महत्वाची कामे करण्यासाठी आपल्या सकाळी 10 पर्यंत वाट पाहावी लागते, विशेषत: सरकारी बँका 10 वाजता सुरू होतात. मात्र लवकरच बँकांचे कामकाज सुरू होण्याच्या वेळेत बदल होणार असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सप्टेंबरपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल लागू करण्यात येण्याची शक्यता आहेत.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने सर्व सरकारी आणि विभागीय ग्रामीण बँकांचे (RRB) कामकाज सकाळी 9 वाजता सुरू करण्यासंदर्भात प्रस्‍ताव दिला आहे. टाइम्‍स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार देशभरातील सर्व बँकांचे कामकाज एकाचवेळी सुरू करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

जून महिन्यात या संदर्भात एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. बँकिंग विभागाची ही बैठक व्हिडीओ कॉन्फेरन्सिंगद्वारे घेण्यात आली होती. ग्राहकांच्या सुविधांकडे लक्ष देऊन बँकांचे कामकाज सुरू करण्यात आले पाहिजे, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले होते.

ग्राहकांच्या सुविधांचा विचार करण्यासंदर्भात एक उपसमिती तयार करण्यात आली होती. या उपसमितीच्या बैठकीत भारतीय बँकिंग असोसिएशन (IBA) बँकांचे कामकाज सुरू करण्यासंदर्भात तीन पर्याय ठेवण्यात आले आहे. पहिला- सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत, दुसरा सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत आणि तिसरा सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत.

IBA चे सीईओ वीजी कन्नान यांच्या माहितीनुसार या पर्यायांसह अन्य पर्यायांवर देखील विचार केला जाऊ शकतो. तसेच ते म्हणाले की, ‘आम्ही कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. बँका आपल्यापरिने कामकाजच्या वेळेसंदर्भात निर्णय घेऊ शकतात. एका शहरात स्थानिक गरजेनुसार कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करता येणे शक्य होऊ शकते’.