Pulwama नांदेडच्या मुदखेड येथे प्रशिक्षण घेतलेले सहा जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांपैकी सहा जवान नांदेड जवळच्या मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील असून, दहा दिवसापूर्वीच प्रशिक्षण पूर्ण करुन ते जम्मू कश्मिरच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात रुजू झाले होते. आज त्यांना मुदखेड येथील या केंद्रात भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच तेथील ध्वज अर्ध्यावर आणून दुखवटा व्यक्त करण्यात आला.

हिंदुस्थानच्या जखमेवर चीनने मीठ चोळले, जैशचा म्होरक्या मसूदला पाठिंबा

तब्बल वीस वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली असून याठिकाणी अनेक जणांना प्रशिक्षण देण्यात येते. यावर्षीच्या प्रशिक्षणात देखील देशभरातील विविध ठिकाणाहून आलेले प्रशिक्षणार्थी याठिकाणी प्रशिक्षित होऊन बाहेर पडले होते. गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात याच प्रशिक्षण केंद्रातून दहा दिवसापूर्वी बाहेर पडलेले आणि केंद्रीय राखीव पोलीस दलात सामील झालेले सहा जवान शहीद झाले आहेत. यात 82 बटालियनचे जी.सुब्रम्हण्यम (तमिळनाडू), गुरु एच. (कर्नाटक), 61 बटालियनचे हेमराज मीना (कोटा), प्रसन्न साहू (ओडिसा), रतनकुमार ठाकूर (ग्रुप सेंटर काठगोदाम बिहार), 35 बटालियनच्या अश्विनी काओची (मध्यप्रदेश) या सहा जणांचा समावेश आहे. या केंद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राकेशकुमार यादव यांनी ही माहिती दिली. या सर्वांना मुदखेडच्या केंद्रात एक शोकसभा घेवून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच या केंद्रातील ध्वज अध्र्यावर आणण्यात आला व दुखवटाही व्यक्त करण्यात आला.

Pulwama Attack अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल
कश्मीरमध्ये पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण, कर्फ्यू लागू

राकेशकुमार यादव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सीआरपीएफचे जवान हे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत उत्तमरितीने प्रशिक्षित होऊन जातात आणि देश विघातक शक्तीशी संघर्ष करतात, मग ते हिंदुस्थानी सिमेवर असो किंवा अन्य कुठल्या वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्या असो यात ते प्राणपणाने लढत असतात. पुलवामा येथे झालेल्या घटनेने आमच्या जवानांचे मनोबल कमी झालेले नाही. मात्र दहशतवादी व अशा प्रकारच्या अपराधी मंडळींना धडा शिकविण्यासाठी अजून दुप्पट उत्साहाने ते लढतील, असा विश्वासही राकेशकुमार यादव यांनी व्यक्त केला आहे.