
मोक्का गुन्ह्यात वाँटेड असलेल्या सराईताला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. मागील काही दिवसांपासून आरोपी हा पोलिसांना चकवा देत होता.
अनिकेत उर्फ अंड्या विजय कोंढरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोंढरे याच्यासह साथीदांवर बिबवेवाडी पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. मात्र, कारवाईनंतर कोंढरे हा पसार झाला होता. तेव्हापासून बिबवेवाडी पोलीस त्याच्या मागावर होते. या दरम्यान संश़यीत आरोपी कोंढरे हा भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमुर्ती चौकात थांबल्याची माहिती अंमलदार अतुल महांगडे यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून कोंढरेला ताब्यात घेतले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी येवले, प्रणय पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
























































