नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर कल्याण महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप, रिक्षा आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला.  या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे. रविवारी रात्री 11 च्य़ा सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री झालेल्या अपघातात ओतूरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप चालकाचे नियंत्रण सुटून त्याने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचून त्त्यांनी बचावकार्य सुरु केले. तसेच मृत व्यक्तींचे मृतदेह ओतूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
रविवारी झालेल्या या अपघातातील मृतांमध्ये मस्करे कुटुंबातील चार जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.यामध्ये गणेश मस्करे( 30), कोमल मस्करे(25), हर्षद मस्करे(04) आणि काव्या मस्करे(06) यांचा समावेश आहे. हे कुटुंब मढ येथे भाजीपाला व्यवसाय करायचे. उर्वरित चार मृतांची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.