
भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला. मंतू अमूल्य प्रमाणिक (वय 52, रा. विमाननगर) असे ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गौतम साहा (वय ३१, रा. कॅम्प विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंतू एका खासगी कंपनीत कामाला होते. पाच दिवसांपुर्वी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते विमाननगरमधील एका महाविद्यालयासमोरील रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने गंभीररित्या जखमी होउन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. पाटील अधिक तपास करीत आहेत.






























































