पुण्यात दुचाकीच्या अपघातात तरूण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव दुचाकी घसरून पडल्याने झालेल्या अपघातात तरूण ठार झाला. हा अपघात 17 फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास खडकीत घडला.

गणेश रामदास शिंदे (वय 29, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश 17 फेब्रुवारीला रात्री दुचाकीवरून घरी चालला होता. त्यावेळी दुचाकी घसरून खाली पडल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ तपास करीत आहेत.