पुण्यात बुधवार पेठेसह लोहगावमध्ये घरफोडी, दोन लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरात  दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये 2  लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी नागरिकांनी फरासखाना व विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवार पेठेतील पालेकर वाड्यात राहणार्‍या 46 वर्षीय महिलेच्या घरातून चोरट्यांनी 25 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 फेब्रुवारीला तक्रारदार महिला कुटुंबासह कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या.  त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराच्या  कुलूप तोडून  25 हजार 300 रूपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. दोन दिवसांनंतर घरी आल्यानंतर महिलेला घरफोडी झाल्याचे दिसून आले.

लोहगाव येथील खंडोबामाळ येथे राहणार्‍या आनंत गिरीगोसावी यांच्या घरातून 1 लाख 47 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंत 20 जानेवारीला रात्री कामाच्या निमित्ताने गावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून 1 लाख 47 हजार रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेले.