धुमस्टाईल चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दापाश, चार लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हडपसर परीसरात धुमस्टाईल दुचाकी चालवित चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा युनीट पाचने पर्दापाश केला. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करून दोन चेन, बॅग, तीन दुचाकी असा चार लाखांवर ऐवज जप्त केला आहे. संजय रामब्रिज सहाणी (वय 21 रा. उत्तरप्रदेश ) आणि दिपककुमार अभय सिंग (वय 21 रा बिहार सध्या दोघे रा. होळकरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हडपसरमध्ये वाढत्या सोनसाखळी चोरीच्या पार्श्वभूमीवर युनीट पाचकडून तपास करण्यात येत होता. त्यानुसार होळकरवाडी परिसरात राहणाNया दोघांनी दुचाकी चोरली असून ते मंतरवाडीत फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांना सापळा रचून दोघांना अटक केले. त्यांच्याकडून दोन चैन स्नॅचिंग, एक बॅग लिप्टीग तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय प्रसाद लोणारे, रमेश साबळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, विनोद शिवले, चेतन चव्हाण यांनी केली.

कोट- अटकेतील आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर काही राज्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. प्रत्येक नवीन ठिकाणी गेल्यानंतर सर्व भागाची पाहणी करून ते चोNया करीत असल्याचे उघडकीस आले आहे. – हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, युनीट पाच