
खूनाच्या गुन्ह्यात कारागृहातून बाहेर आलेल्या सराईताने तरूणाला धमकी देत त्याच्याकडून तब्बल 9 लाखांची खंडणी उकळताना रंगेहात पकडले आहे. तुषार बाळासाहेब बधे (रा.सिंहगडरोड, धायरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत किशोर अहिवळे (रा. निगडी) यांनी तक्रार दिली आहे.
अनिकेत आयटी इंजिनिअर असून कोरोनामुळे त्यांची कंपनी बंद पडली होती. त्यामुळे उदर्निवाहकरीता त्यांनी एका खासगी बँकेचे लोन प्रोसेसिंग व कस्टमरचे लोन प्रोसेसिंगची कागदपत्रे बँकेज जमा करण्याचे काम सुरू केले होते. त्यानुसार लोन फाईन पुर्ण करून देण्यासाठी त्यांनी वाल्मिकी तुपे यांच्याकडून 3 लाख 50 हजार घेतले. मात्र, त्रुटी असल्यामुळे लोन फाईल रिजेक्ट झाली. त्यामुळे अनिकेत यांनी वाल्मिकी तुपे यांना 75 हजार रुपये परत दिले. उर्वरित रक्कम ते हळूहळू देत होते. दरम्यान, खूनाच्या गुन्ह्यात कारागृहातून बाहेर आलेल्या तुषार बधे याने अनिकेतला फोन करून वाल्मिकी तुपेचा भाऊ बोलत असल्याचे सांगितले. तुपेचे जे पैसे तुझ्याकडे आहेत ते मला पाहीजे आहेत, नाहीतर तुझ्या घरातील सर्व साहीत्य घेवुन जातो, तुझ्या घराला कुलुप लावतो, तुझ्या आईला बाहेर काढतो, अशी धमकी देउन 9 लाखांची मागणी केली.
त्यामुळे अनिकेत यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रारी अर्ज दिला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने आरोपीला कॅम्परोड परिसरात खंडणी घेताना रंगेहात पकडले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, विनोद कुंके, सौदाबा भोजराव, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रविण पडवळ, प्रदिप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर यांनी केली.


























































