पुण्यात दुचाकीच्या डिकीत चाकू घेऊन फिरणाऱ्यास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीच्या डिकीमध्ये रेम्बो चावूâ घेउन फिरणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून चाकू आणि दुचाकी असा 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. राहूल परदेशी (वय 19, रा. खडकी बाजार) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिस हद्दीत गस्त घालत असताना सोमवार पेठ परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या तरूणाचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी राहूलला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीच्या डिकीमध्ये रेम्बो चाकू आढळून आला. शस्त्रबंदीचा आदेश झुगारून फिरल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, हेमंत पेरणे, सचिन पवार, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, सुशील लोणकर यांच्या पथकाने केली.