
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलीला मिळालेल्या प्रवेशाला कागदपत्रे तपासून ऑनलाईन मान्यता देण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना हवेली पंचायत समितीतील एकासह गटशिक्षणाधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. रामदास शिवनाथ वालझाडे. (वय 50 पद-गट शिक्षण अधिकारी) आणि विकास नंदकुमार धुमाळ,( वय -4O पंचायत समिती हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या मुलीचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आर टी इ) अन्वये हडपसर येथे एका शाळेत लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादीत नाव समाविष्ट करायचे होते. त्याकरीता कागदपत्रे तपासून प्रवेशासाठी ऑनलाईन मान्यता देण्यासाठी यातील आरोपी विकास धुमाळ यांनी आरोपी गटशिक्षणाधिकारी वालझोडे यांच्यासाठी 50 हजारांची लाचेची मागणी करून रक्कम स्विकारली.
























































