
माजी पोलिस महासंचालकांच्या घरासह इतर दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल 1 कोटी 34 लाखांचा ऐवज चोरून नेणाऱ्यांना कोंढवा पोलिसांनी हरियानातून अटक केली. चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे. राजेशकुमार मोहनलाल सरोज, राकेशकुमार मोहनलाल सरोज आणि सराफ मदनलाल मोहनलाल कुम्हार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उंड्री परिसरात राहणारे माजी पोलीस महासंचालक राज खिलनानी यांच्यासह दोन घरामध्ये चोरट्यांनी चोरी करून 1 कोटी 34 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना 23 ते 24 ऑगस्ट 2020 मध्ये घडली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी मनीषकुमारला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत कोंढवा पोलिसांनी विविध राज्यात शोध घेउन सरोज बंधूसह सराफाला अटक केली आहे.


























































