पुणे – गर्दीचा फायदा घेउन प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरफोडीसह गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून तीन लाख रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. सर्फराज इकबाल मोमीन (वय 22, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गर्दीचा फायदा घेउन प्रवाशांचे दागिने चोरणार सराईत स्वारगेट परिसरातील एका हॉटेलजवळ उभा असल्याची माहिती पोलीस शिपाई ज्ञाना बडे, सचिन कदम आणि मनोज भोकरे यांना मिळाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून सर्पâराजला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडीसह प्रवाशांचे दागिने चोरल्याची गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्र्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, सचिन कदम, विजय कुंभार,विजय खोमणे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, सोमनाथ कांबळे, संदिप साळवे, लखन ढावरे ,वैभव शितकाल, शंकर गायकवाड, ऋषिकेश तिथमे यांच्या पथकाने केली.