पेपर विक्रेत्याची पैशांची बॅग पळविली, लक्ष्मी नारायण थिएटरजवळ मारहाणीचा थरार

शहरातील मध्यवर्ती लक्ष्मीनारायण थिएटरजवळ एका पेपर विक्रेत्याच्या ताब्यातून 90 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी शंकर अण्णा खुटवड (वय – 50, धनकवडी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी शंकर यांचा पेपर विक्रीचा व्यवसाय असून आज सात वाजण्याच्या सुमारास ते लक्ष्मीनारायण थिएटर समोरील पुलाखाली थांबले होते. त्यावेळी त्यांच्याकडे 90 हजार 300 रुपये होते. अचानक दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी शंकर यांच्याकडून पैशांची बॅग हिसकावली. त्यांनी आरडाओरडा केला असता एकाने चोरट्यांचा पाठलाग करून दुचाकीवर लाथ मारून त्यांना खाली पाडले. मात्र चोरट्यांनी तरूणाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवून पळ काढला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या