
शहरात कामानिमित्त प्रवास करताना गडबडीत गहाळ झालेले तब्बल 13 लाख 45 लाखांचे 74 महागडे मोबाईल गुन्हे शाखेच्या युनीट दोनने पाठपुरावा करून नागरिकांना मिळवून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. या संदर्भात पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर लॉस्ट अॅण्ड फाउंड पोर्टलवर तक्रारींची ऑनलाइन नोंद करण्यात आली होती.
नागरिकांनी ऑनलाइन तक्रार केल्यानंतर युनीट दोनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमंलदार समीर पटेल यांनी तांत्रिक विश्लेषणाची माहिती घेतली. त्यानुसार संबंधित मोबाईल कंपन्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. गहाळ झालेल्या 74 मोबाईल विविध भागांत कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल वापरकत्र्यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर संबंधितांनी मोबाईल जमा केले होते. हरविलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, एपीआय प्रकाश मोरे, वैशाली भोसले, यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, किशोर वग्गू, संजय जाधव, नामदेव रेणूसे, मोहसिन शेख, चेतन गोरे, चंद्रकांत महाजन, उत्तम तारू, निखील जाधव, समीर पटेल, गजानन सोनुने, मीतेश चोरमोले, कादीर शेख, गोपाळ मदने, अजित फरांदे, अरूणा शिंदे यांनी केली.























































