
पिंपरी परिसरात तरूणाच्या खूनातील फरारी दोघा आरोपींना लोणीकंद पोलीस तपास पथकाने वाघोलीतून अटक केली आहे. आरोपींना पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुरज रामदास मोहिते (वय – 21, रा. रामनगर, पिंपरी चिंचवड) आणि करण भिमराव वंजारी (वय – 20, रा. शरदनगर, चिखली, पिंपरी चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लोणीकंद पोलीस 4 डिसेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पिंपरीत खून करून पसार झालेले दोघेजण वाघोलीत राहत असल्याची माहिती पोलीस शिपाई अमोल ढोणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सुरज मोहिते अणि करण वंजारी यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही कामगिरी उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, एपीआय गजानन जाधव, बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अजित फरांदे, अमोल ढोणे, पांडुरंग माने, साईनाथ रोकडे, दिपक कोकरे, आशिष लोहार, बाळासाहेब तनपुरे यांनी केली.

























































