
पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार सराईताला खंडणी विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे असा 35 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. साहिल अशोक रजपूत (वय 22, रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत नदीपात्रातील मंदीराजवळ आल्याची माहिती राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून साहिलला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल आणि काडतुस मिळून आले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, पांडुरंग वांजळे, ओंबासे, तुपसौंदर,राजपूत, साठे, लांडगे, चव्हाण, सोनवलकर, केकाण, कांदे यांच्या पथकाने केली.
























































