धक्का मारून दोन मोबाईल हिसकावून नेले, पर्वती परिसरात पहाटेच्या घटनांमुळे खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील पर्वती परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरूणांना धक्का मारून दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. पहाटेच्यावेळी घडलेल्या घटनांमुळे व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांपुर्वी फिर्यादी नीलेश जंगम (वय 28 ) घराजवळ थांबले होते. त्यावेळी त्यांना फोन लावण्यासाठी मोबाईल हातात घेतला असता, पाठीमागून आलेल्या दोघा चोरट्यांनी नीलेश यांना धक्का मारून खाली पाडले. त्यांच्या हातातील 12 हजारांचा मोबाईल चोरून नेला. दुसऱ्या घटनेत गाडी पार्किंग केलेल्या जागेत थांबलेल्या तरूणाला धक्का देउन खाली पाडून दोघा चोरट्यांनी त्यांच्याकडील 37 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी कैलास भुवड (वय 26) यांनी तक्रार दिली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप करीत आहेत.