येरवड्यात टोळक्याचा राडा, खुन्नस दिल्याच्या रागातून दोघांवर जीवघेणा हल्ला

खुन्नस दिल्याचा राग आल्यामुळे मित्रासह कोयता घेऊन एकाचा पाठलाग करताना आरोपींनी जमाव जमवून अल्पवयीनाला रॉडने मारून गंभीर जखमी केले. त्याशिवाय त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास येरवड्यातील डायमंड चौकात घडली.

याप्रकरणी अक्षय नवगिरे, रॉबर्ट ससाणे, आकाश (पूर्ण नाव नाही ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीनाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास फिर्यादी अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र पांग्या उर्फ हर्ष गायकवाड, राकेश मोरे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी रॉबर्ट ससाणे फिर्यादीकडे पाहून खुन्नस देत निघून गेला. त्याचा राग आल्यामुळे फिर्यादी आणि पांग्याने हातात कोयता घेून रॉबर्टचा पाठलाग केला.

मात्र, रॉबर्ट मिळून न आल्यामुळे फिर्यादी आणि पांग्या पुन्हा डायमंड चौकात आले. त्यावेळी आकाशने बेकायदेशिर जमाव जमवून फिर्यादीच्या दुखापतग्रस्त पायावर रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याशिवाय आरोपी रॉबर्टने हर्ष गायकवाड याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या